'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' आणि रग्गड पदव्या असलेला मालक
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या बसस्थानकासमोर असलेलं 'ग्रॅज्युएट खिचडी सेंटर' नावाचं टपरीवजा हॉटेल नावातील वेगळेपणामुळं लक्ष वेधून घेतं. त्याहूनही चकित करणारी बाब म्हणजे ते चालवणाऱ्या वसंत लामतुरे या तरुणाच्या रग्गड पदव्या! एम. ए., बी. एड, सेट, पेट या पदव्या असूनही हा तरुण हे हॉटेल चालवतो. त्याचं कौतुक करावं की, पैसा नसल्यामुळे त्याच्यावर ही पाळी आली आहे, म्हणून व्यवस्थेच्या नावानं बोटं मोडावीत हा प्रश्न पडतो.......